File Photo 
नांदेड

नांदेड @४९३ ; नऊ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, उपमहापौरही बाधीत

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : बुधवारी (ता. आठ) सकाळी दोन टप्यात अहवाल प्राप्त झाला आहे. दोन्ही अहवालात मिळुन नऊ बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत. तर, एका महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

मंगळवारी (ता. सात) प्रयोग शाळेकडून दिवसभरात १०२ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यात बाधीत रुग्णांचा आत्तापर्यंतचा जिल्ह्यातील सर्वात मोठा असा २६ जणांचा आकडा पुढे आला आहे. यामध्ये कॉग्रेस पक्षाचे उपमहापौर यांचा देखील समावेश आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ६५ व त्यानंतर काही वेळाने पुन्हा ४१ स्वँब अहवाल प्राप्त झाले. यात एकुण नऊ रुग्ण पॉझिटिव्ह व कंधार तालुक्यातील सोमनाळा तांडा येथील एका ६५ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे झाल्याचे डॉ. भोसीकर यांनी माहिती दिली.

रुग्ण संख्या ४९३ इतकी झाली​

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ४९३ इतकी झाली आहे. उपचारा दरम्यान मृत्यू संख्या २३ वर पोहचली आहे. ३३५ रुग्ण बरे होऊन घरी पोहचले आहेत. १३५ बाधीत रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. बुधवारी सापडलेल्या रुग्णामध्ये कंधार काटकळंबा (२४) पुरुष, सीडको नांदेड (३६) पुरुष, सावित्रीबाई फुले नगर (३८) पुरुष, तागलेनगल्ली मुखेड (३४) पुरुष, देगलुर (४६)पुरुष, परभणी जिल्ह्यातील वस्सा (७०) पुरुष तर, गांधीनगर बिलोली (३२) व किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील (१८) आणि (२०) हे तीन बाधीत पूर्वीच्या बाधीत रुग्णांच्या सहवासातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
कंधार तालुक्यातील उमरज सोमनाळा तांडा येथील ६५ वर्षी महिला डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २९ जून रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. दुसऱ्यादिवशी ती पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी मध्यरात्री या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

ग्रामिण भागातील रुग्णांची संख्या मोठी​

नांदेड जिल्ह्यात रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने देखील लॉकडाऊनच्या नियमात काही अंशी बदल केला असून, पुढील काळात नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी योग्यती काळजी न घेतल्यास पुन्हा नियमावली कडक करण्याचे संकेत दिले आहेत. मागील तीन दिवसात ५४ रुग्णांची भर पडली असून, यामध्ये ग्रामिण भागातील रुग्णांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. राजकीय पुढाऱ्यांमध्ये सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याने त्यांच्या संपर्कातील अनेकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. 

एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे बाजारात, सार्वजनिक ठिकाणी किराणा दुकाने, मद्य दुकाने अशा बहुतेक सर्वच ठिकाणी नागरीक कुठलिही खबरदारी न घेता गर्दी करताना दिसून येत आहेत. हे चित्र न बददल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT